गोदाकाठच्या १७ गावांना सतर्कतेचा इशारा
वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या संततधार पावसामुळे शिवना व गोदावरी या प्रमुख नद्या प्रवाहित झाल्या आहेत. गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील सरला बेट (गोदाधाम) पाण्याने वेढले आहे. गोदाकाठच्या १७ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यंदा ३० जुलैअखेर तालुक्यात सरासरीच्या ८२ टक्के म्हणजे २५७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एक जून ते ३० जुलै कालावधीत सरासरी ३१४.२ मिमी पावसाच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील पर्जन्यमान
(१ जून ते ३० जुलै) :
सरासरी पाऊस
प्रत्यक्ष पाऊस
पावसाची टक्केवारी
३१४.२ मिमी
२५७.९ मिमी
८२%
सर्वाधिक पाऊस
लासूरगाव
२४८.२ मिमी
सर्वात कमी पाऊस
जानेफळ
१०१.३ मिमी
जून - जुलै महिन्यांत अपेक्षितं २०५. ७ मिमी पावसाच्या तुलनेत यंदा २८७ मिमी म्हणजे १३९.५ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात १५ दिवस. पाऊस पडला असून महसूल मंडळांमध्ये सरासरी १७२.२ मिमी (१६१.७ टक्के) पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन व बाजारपेठेवर परिणाम झाला असला, तरी खरीप पिकांचे अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केलेली नाही.












